सप्रेम नमस्कार,
पुण्यात राहणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येऊन सुखदुःखात सहभागी होण्यासाठी वैचारिक देवाण-घेवाण साधण्यासाठी व नेहमी एक जुटीने राहण्यासाठी बारा वर्षापूर्वी अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली.
मागील बारा वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत याची आपणास कल्पना आहेच उदाहरणार्थ रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, इप्तार पार्टी, श्री. म.नी.प्र. जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांची पूजा व गुरुवंदनाचा कार्यक्रम, कोजागिरी पौर्णिमा, येळ-अमावस्या निमित्त स्नेहभोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वैद्यकीय मदत इत्यादी.
मंडळाच्या माध्यमातून काम करत असताना सोलापूर जिल्ह्यातील पुणे येथे वास्तव्यास असलेल्या असंख्य नागरिकांच्या भेटीगाठी होत असत. त्या नागरिकांनी जिल्ह्याचा मेळावा घेण्यासंबंधी वारंवार इच्छा व्यक्त केली म्हणून आम्ही दूरदृष्टी ठेवून अक्कलकोट तालुक्यापुरते मर्यादित न राहता जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बांधव जोडले जातील, व एक मोठी संघटना तयार होईल, मोठी संघटना असेल तर त्याचे महत्त्व काय असू शकते हे आपल्या सारख्या सुज्ञ नागरिकांना सांगण्याची गरज नाही.
या संबंधात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत एकमताने रविवार दिनांक ३ मार्च २०१९ रोजी मेळावा घेण्याचे ठरले. या मेळाव्यात मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे व आमदार श्री. सिद्धारामजी म्हेत्रे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने शिंदेसाहेब व म्हेत्रेसाहेब यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार असून सर्वांना वैयक्तिक गाठी-भेटीचा उपयोग येणार आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. भविष्यात आपणा सर्वांना खूप मोठा उपयोग होणार आहे.
ह्या निमंत्रण पत्रिकेद्वारा आपणास नम्र विनंती करण्यात येते की, सोलापूर जिल्हा पुणे रहिवासी मित्र मंडळ आयोजित भव्य स्नेहमेळाव्यास आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह बहुसंख्येने उपस्थित राहावे.
( माजी केंद्रीय गृहमंत्री )
आमदार ( माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य )